खानदेशजळगावा जिल्हाभुसावळमहाराष्ट्र

गौताळा घाटात भीषण अपघात : ब्रेक फेल झाल्याने आयशर १०० फूट दरीत; ७ गंभीर, ६ जखमी !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जवळ असलेले गौताळा घाटात रविवारी (दि. २९) सकाळी भीषण अपघात घडला. ऊसतोडणीसाठी गेलेले मजूर बारामतीहून दस्तापूर (ता. सोयगाव) गावाकडे परतत असताना आयशर वाहनाचा ब्रेक फेल होऊन वाहन १०० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले असून ६ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दस्तापूर येथील मजूर बारामती साखर कारखान्यात ऊसतोडणीसाठी गेले होते. कामाचा पट्टा संपल्याने ते (एमएच २१ बीएच ०४४२) या आयशरने गावाकडे परतत होते. गौताळा अभयारण्यातील कन्नड-नागद मार्गावरील म्हैसघाटात वाहन पोहोचताच अचानक ब्रेक फेल झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन घाटातील संरक्षक भिंतीवर आदळले आणि त्यानंतर दोन ते तीन पलट्या खात दरीत कोसळले.
या अपघातात चालकासह एकूण १३ जण जखमी झाले. त्यापैकी वंदना अशोक अंभोरे (२५), रुकसाना सलीम तडवी (१७), दिव्या हिरामण पगारे (१७), सोनीबाई सलीम तडवी (३०), रंजनाबाई हिरामण पगारे (३०), मनीषा प्रवीण वाघ (२५) व ममता प्रवीण वाघ (१ वर्ष) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर चालक महेश अंदुरे (३३, रा. खेड, पुणे), अशा सुखदेव पगारे (४५), कोमल हिरालाल पगारे (८), ऋतिक प्रवीण वाघ (४), प्रवीण बापू वाघ (३०) व सलीम जमाल तडवी (३५, सर्व रा. दस्तापूर) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी दोरखंड व चादरीच्या साहाय्याने जखमींना दरीतून बाहेर काढले.दरम्यान, अपघातावेळी ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच काहींना उडी मारण्यास सांगितल्याने काहींचे प्राण वाचल्याची माहिती जखमींनी दिली. तब्बल ३५० किमीचा प्रवास करून गावापासून अवघ्या १३ किमी अंतरावर असताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button