उत्कृष्ट तपासामुळे मुक्ताईनगर पोलिसांचा सन्मान; संदीप वानखेडे,पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप देशमुख, दीपक ढाकरे यांना गौरव

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर प्रतिनिधी :
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अपहरण व मिसिंग प्रकरणांचा अल्पावधीत यशस्वी तपास करून संबंधित मुली व महिलांचा शोध लावल्याने त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने त्यांचा प्रशंसापत्र देऊन गौरव केला आहे.
पोलीस नाईक 2991 संदीप शांताराम वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल 1134 प्रदीप अभिमान देशमुख व पोलीस कॉन्स्टेबल 203 दीपक कैलास ढाकरे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपहरण व मिसिंग प्रकरणांचा कसोशीने तपास करत संबंधित मुली व महिलांचा कमी कालावधीत शोध घेत त्यांना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात हजर केले. त्यांच्या या कर्तव्यदक्ष कामगिरीची दखल घेत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी यांनी त्यांना प्रशंसापत्र प्रदान करून अभिनंदन केले.





मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या विविध सीसीटीएनएस प्रकरणांमध्ये तपास करताना संबंधित पथकाने वेगाने हालचाली करून तपास पूर्ण केला. त्यामुळे पीडित कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रशंसनीय कार्यामुळे मुक्ताईनगर पोलीस दलाचा मान उंचावला असून पोलीस दलातही अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
पोलीस अधीक्षकांनी आपल्या संदेशात संबंधित पोलिसांनी भविष्यातही अशाच प्रकारे प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत न्यायव्यवस्थेची परंपरा अधिक भक्कम करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या कार्याबद्दल सदिच्छा व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



