बुलढाणामहाराष्ट्र

जळगाव जामोद तालुक्यातील चालठणा आदिवासी भागात होळी उत्साहात साजरी; पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

बुलढाणा: जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील चालठणा परिसरातील आदिवासी भागात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गावातील आदिवासी बांधवांनी एकत्र येत होळी प्रज्वलित करून पूजा-अर्चना केली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात नृत्य व पारंपरिक गाण्यांनी परिसर दुमदुमून गेला.
होळी प्रज्वलनानंतर ग्रामस्थांनी गावाच्या सुख-समृद्धीसाठी तसेच चांगल्या पिकांसाठी प्रार्थना केली. लहान मुलांपासून ते युवक व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने या सणात सहभाग घेतला. आदिवासी समाजातील पारंपरिक संस्कृती जपत हा सण साजरा करण्यात आला.
या प्रसंगी चालठाना गावाचे पोलीस पाटील विजय तायडे, तोताराम मोतीराम आदीवासी, श्रीकृष्ण काळे, साहेबराव भगत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत आणि आनंदात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कार्यक्रम कोणत्याही अनुचित प्रकाराविना सुरळीत पार पडला. पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.
होळीच्या निमित्ताने चालठणा परिसरातील आदिवासी भागात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन करत हा सण दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत सण साजरा करण्यात आला. होळीच्या निमित्ताने चालताना परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आदिवासी समाजातील परंपरा व सांस्कृतिक दर्शन यावेळी घडले…..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button