बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती पदासाठी संग्रामपूर येथे 10 मार्च रोजी निवडणूक!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
रतन भगत.
सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक येत्या 10 मार्च 2026 रोजी होत आहे यासाठी समितीचे सभागृहात होणाऱ्या विशेष सभेच्या कार्यालयीन कामकाजासाठी खामगाव येथील सहकारी अधिकारी श्रेणी एक आमले यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १८ संचालक संख्या असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भावरावोसार पाटील व संजीव इंगळे यांनी सभापती उपसभापती पदाचा मागील काही दिवसांपासून राजीनामा दिल्यानंतर एक महिन्यापासून हे दोन्ही पदे रिक्त होती या दोन पदासाठी आता ही निवडणूक होत आहे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे .या संस्थेत एका गटाकडे बारा तर दुसऱ्या गटाकडे सहा संचालक संख्या आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये या संस्थेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. त्या अडीच वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत दोन सभापती होऊन गेले आहेत. आता तिसऱ्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक होत आहे यावेळी ही निवडणूक अविरोध पार पडणार असल्याचे संकेत आहेत.



