बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शिवराम डिक्कर यांची युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
​
अकोट:येथील तालुका काँग्रेस कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात शिवराम डिक्कर यांची युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांच्या हस्ते डिक्कर यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
​या निवडीमुळे अकोट तालुका व जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. नियुक्ती पत्र प्रदान करताना जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांनी सांगितले की, आगामी काळात युवकांचे संघटन मजबूत करून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवराम डिक्कर यांचे कार्य मोलाचे ठरेल.
​या सोहळ्याला काँग्रेस कमिटीचे महासचिव महेश गणगने, प्रदेश सचिव प्रशांत पाचडे, प्रमोद चोहरे, अनोख राहणे यांसह जिल्ह्यातील बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शिवराम डिक्कर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
​आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शिवराम डिक्कर म्हणाले की, “पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. युवकांच्या समस्या मांडण्यासोबतच काँग्रेसची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.” या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे….✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button