कर्ज वसुलीसाठी बँकांनी संयम ठेवावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरणार;प्रशांत डिक्कर यांचा बँक व्यवस्थापकांना कडक इशारा….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
बुलढाणा:
कर्जाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांकडून बँकांनी दिशाभूल करीत चालवलेली कर्ज वसुली तातडीने थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी बँक प्रशासनाला दिला आहे.
राज्यात सध्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. निवडणूक काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. माजीमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी संघटनांनी एकवटून पुकारलेल्या एल्गारानंतर सरकारने ३० जूनपर्यंत कर्जमाफीची तारीख निश्चित केली आहे.
एकीकडे सरकार कर्जमाफीची प्रक्रिया राबवत असताना, दुसरीकडे बँकांकडून शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी सतत तगादा लावला जात आहे. या जाचाला कंटाळून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. या पार्श्वभूमीवर डिक्कर यांनी बँक व्यवस्थापकांची भेट घेऊन सुनावले की, “शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार भरणार असल्याने बँकांनी काही काळ संयम पाळणे आवश्यक आहे. बँकांनी आपली आडमुठी भूमिका न सोडल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू, जिल्ह्यासह राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले….



