खानदेशबुलढाणामहाराष्ट्र

बिघडलेला मोबाइल दुकानातून करून आणते, असे सांगून घरून निघालेली २१ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता

(प्रतिनिधी. राजेंद्र मुंडेदुरुस्त

करून आणते, असे सांगून घरून निघालेली २१ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना नांदुरा तालुक्यातील फुली येथे घडली. विशेष म्हणजे, मुलीसोबतच गावातील एक तरुणही बेपत्ता असल्याने पालकांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची दाखल करण्यात आली आहे.

नांदुरा तालुक्यातील फुली येथील रहिवासी असलेल्या कोकीला संजय बोदडे यांची मुलगी सावित्री संजय बोदडे (वय २१ वर्षे) ही २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बिघडलेला मोबाइल शेंबा येथील दुकानातून दुरुस्त करून आणते, असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, रात्र झाल्यानंतरही ती घरी परतली नाही. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. विशेष म्हणजे सावित्रीने घरातून जाताना सोबत ४० हजार रुपये रोख नेल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वेळेपासून सावित्री बेपत्ता आहे, त्याच वेळेपासून गावातीलच देवानंद समाधान सोनुने हा तरुणही बेपत्ता आहे. तसेच देवानंदचा मोबाइल नंबर बंद येत आहे. त्यामुळे सावित्री ही देवानंद सोबतच पळून गेल्याचा संशय तिच्या आईने दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.

या प्रकरणी कोकिळा बोदडे यांनी बोराखडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. बेपत्ता सावित्रीचा रंग सावळा, चेहरा लांबट, उंची: ५.५ फूट असून तिच्या दोन्ही हातांना सहा-सहा बोटे असून तिने अंगात हिरव्या रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लेगीज आणि काळ्या रंगाची सँडल घातलेली आहे. उपरोक्त तरुणीबाबत काही माहिती मिळाल्यास बोरखेडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्याच्या विविध पोलीस स्टेशन हद्दीतून महिला व मुली बेपत्ता होण्याच्या घटना अविरतपणे सुरू आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button