खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

युनिक बाल उत्सव उत्साहात संपन्न

मुक्ताईनगर, दि. २८ फेब्रुवारी २०२६ – मुक्ताईनगरच्या पावन भूमीत आयोजित “युनिक बाल उत्सव” मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित पालक व मान्यवरांची मने जिंकली.

या सोहळ्यास राज्याचे लोकप्रिय आमदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष सौ. देवयानीताई शिरसाट, नगरसेवक तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख छोटू भाऊ भोई, अ‍ॅड. अरविंद गोसावी, नगरसेवक बबलू भाऊ कोळी, माजी नगरसेवक निलेश शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे, माजी नगरसेवक पियुष मोरे, प्रा. शरदजी भालेराव, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री मासुळे तसेच संस्थापक अध्यक्ष आत्माराम मासुळे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेली “छावा”, “हनुमान चालीसा”, “झुलवा पाळणा” यांसारखी सादरीकरणे तसेच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे आणि पाश्चात्य संस्कृतीचेही प्रभावी प्रदर्शन करणारे विविध नृत्यनाट्य प्रकार प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. शौर्यगाथा, बलिदान व त्याग यांचे महत्त्व लहान वयातच मुलांच्या मनावर बिंबवण्याचा स्तुत्य प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

विशेष म्हणजे सादरीकरण करणारा बालगट इयत्ता पहिलीतही दाखल नसतानाही त्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलाविष्काराने सर्वांना अचंबित केले. कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत एकही पालक उठून न गेल्याने कार्यक्रमाच्या यशाची साक्ष मिळाली. पालकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा शाळेच्या प्रयत्नांचा खरा सन्मान ठरला.

यावेळी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे तोंडभरून कौतुक करत संस्थापक अध्यक्ष आत्माराम मासुळे, मुख्याध्यापिका जयश्री मासुळे व संपूर्ण शिक्षकवृंदाच्या अथक परिश्रमांची प्रशंसा केली. शाळेच्या भावी वाटचालीस त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. इतर मान्यवरांनीही गौरवोद्गार काढत संस्थेच्या कार्याचा सन्मान केला.

संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अँकर तुषारजी वाघुडदे यांनी केले. एकूणच “युनिक बाल उत्सव” हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न ठरता बालकांच्या सर्वांगीण विकासाचा प्रेरणादायी सोहळा ठरला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button