अपघातमहाराष्ट्र

तेल्हारा शेरी फाटा येथे भिषण अपघात; तिन्ही शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:-मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

तेल्हारा : (जि. अकोला) तालुक्यातील शेरी फाटा (माळेगाव बाजार रोड) येथे आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात माळेगाव येथील तीन अल्पवयीन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण तेल्हारा माळेगाव परिसरात शोककला पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माळेगाव कडून दुचाकीवरून येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या ईशर ट्रकने जोरदार धडक दिली. इतकी जबरदस्त होती की तिन्ही मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ आणि त्यांचा एक मित्र असल्याची माहिती समोर येत आहे. या तीन अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गणेश आतुरकर वय 17 वर्ष, साई वैष्णव व 13 वर्ष, व दर्शन वैष्णव 16 वर्ष आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात असून आरोपी चालकास शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. अपघाताची वार्ता करता स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली. शेरी फाटा परिसरात वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला. या मार्गावर वेग नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर, सिग्नल, किंवा पोलीस बंदोबसाची मागणी वारंवार करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपी स्थानिकांकडून केला जात आहे. एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाल्याने त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात शोक सागर उसळला असून अनेकांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. तेल्हारा पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे…..✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button