खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

जळगाव येथे सकाळ समूह मार्फत आयोजित ‘गौरवगाथा’ कार्यक्रमास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

जळगांव येथे सकाळ समूहमार्फत “गौरवगाथा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा निश्चितच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद क्षण असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी म्हटले. अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रमाबद्दल त्यांनी सकाळ समूहाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

कार्यक्रमास श्री.अरुण भाई गुजराती (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा) तसेच श्री.महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) हे प्रमुख उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button