गुन्हेगारी

३५ वर्षीय अनोळखी युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । शहरातील चारमोरी रेल्वे रूळाजवळ ३१ डिसेंबर रोजी सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास एका ३५ वर्षीय अनोळखी युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. रेल्वे रूळाजवळ उभा असलेला हा युवक अचानक धावत गेला व शालीमार एक्स्प्रेससमोर आला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

मृतक युवकाच्या अनोळखीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर, मानेवर गोंदवलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेबाबत शेगाव उपस्थानक प्रबंधक यांनी दिलेल्या मेमोवरून लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. मृत युवकाबाबत कोणलाही काही माहिती असल्यास लोहमार्ग पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार पंचकृष्ण खिराडे किंवा शुध्दोधन पाडेन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button