जळगावा जिल्हामहाराष्ट्र

रावेर तालुक्यात दारू पत्ता ” सट्टा मटका चा धुमाकुळ प्रशासन मात्र मौनात – नागरीकांत संतप्त सवाल ?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर : प्रतिनिधी विनोद तायडे
सविस्तर वृत्त असे की रावेर शहर व रावेर तालुक्यामध्ये अवैध दारु -सट्टा व पत्त्यांचे अडडे मोठ्या प्रमाणात सुरु असुन हे धंदे अक्षरशा जोमात चालत आहेत दिवसाढवळ्या अवैध धंद्यांची उघड उघड विक्री होत असतांना दिसून येत आहे तर काही ठिकाणी पत्यांचे क्लब सुद्धा चालत आहे त तरी पोलिस प्रशासन व दारुबंदी विभागाचे अधिकारी मात्र याकडे डोळे झाक करीत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे
या मुळे परिसरातील तरुणाई तसेच अल्पवयीन मुले हि अवैध धंधांच्या आहारी जाऊ लागली आहेत सामाजिक स्तरावर याचे गंभीर परिणाम दिसून येत असुन नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे व असे कितीतरी अड्डे संपूर्ण तालुका भर सुरू आहेत याचा मागोवा घेतल्यास आकडेवारी भयावह असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे
” नागरीकांचा प्रशासनाला सवाल ?
लोकांच्या आरोग्याशी व भावी पिढीच्या भवितव्यांशी खेळणारे हे धंदे थांबविण्यासाठी पोलिस व दारुबंदी प्रशासन काय कारवाई करणार ? या अंड्यांना आळा घालुन जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाणार की नाही या प्रश्नांची उत्तरे मिळे पर्यन्त नागरीकांचे लक्ष प्रशासनाकडे लागले आहे
” सामाजिक हानी गंभीर “
सट्टा दारू व जुगारामुळे केवळ कुंटुंबाची हानीच नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे आज या धंद्यांमुळे अनेक घरांची उधवस्त स्थिती झाल्याचे दिसून येत आहे व मुले व्यसनाधिन होत आहे तरीही प्रशासन निष्क्रिय आहे
हिच खरी खंत आहे “
तसेच एवढे अवैध धंदे खुले आम होत असणे हे केवळ कायद्याला झुगारुण देणेच नव्हे तर समाजाच्या ढासळ त्या स्थितीचे स्पस्ट चित्र आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button