Uncategorized

नाभिक समाजाला संतांचा वारसा आहे, समाजप्रबोधनाचा वारसा आहे .

नाभिक समाजाला संतांचा वारसा आहे, समाजप्रबोधनाचा वारसा आहे .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

रावेर शहर प्रतिनिधी विकास आमोदकर .यातून

, संतशिरोमणी सेना महाराज सांगतात, ‘आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक’ आपल्या नाभिक (न्हावी) व्यवसायाचा रूपक वापरून आध्यात्मिक शिकवण देतात: ‘आम्ही वारीक वारीक’ (बारीक, सूक्ष्म) काम करू आणि ‘हजामत बारीक’ (अतिशय काळजीपूर्वक) करू, म्हणजे मनातील विकार, वाईट विचार आणि अहंकाराची स्वच्छता करू, असा अर्थ आहे; यामध्ये विवेक (आरसा), वैराग्य (चिमटा) आणि शांती (पाणी) या साधनांचा वापर करून आत्मशुद्धी कशी करावी, हे सांगितले आहे.
इतक्या चांगल्या विचारांचा नाभिक समाज आणि याच नाभिक समाजाच्या कौशल्यात्मक व्यवसायाचा उच्चार करताना सन्माननीय विधानसभेचे आमदार जयंत पाटील साहेब यांनी फार खालच्या पातळीवर भाष्य केले. पोलीस प्रशासनाच्या संदर्भामध्ये दाखला देत असताना त्यांनी नाभिक समाजाच्या व्यवसायाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला. ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्यावरही त्यांनी नाभिक समाजाचा केलेला अपमान ,त्यासाठी वापरलेले शब्द परत घेण्यास नकार दिला ही एक प्रकारची समाजाप्रती त्यांनी तिरस्काराची भावना ,हिनतेची भावना, द्वेषाची भावना, असमंजषाची भावना प्रकट केली आहे. त्याबद्दल याचा आम्ही महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक संघ रावेर शहर रावेर ,तसेच संपूर्ण नाभिक बांधवांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत. त्यांनी तात्काळ समाजाची जाहीर माफी मागावी असे आवाहन आम्ही त्यांना करीत आहोत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button