महाराष्ट्रसामाजिक

खमताने येथील घटनेचा मुक्ताईनगर नाभिक समाजातर्फे निषेध

मुक्ताईनगर । प्रतिनिधी ।

खमताने (ता. सटाणा, जि. नाशिक) येथे १० वर्षीय नाभिक समाजातील अल्पवयीन बालिकेवर ७० वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण नाभिक समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष व मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा मुक्ताईनगर तालुका नाभिक समाजाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. याबाबत नाभिक समाजाने तहसीलदारांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, खमताने (ता. सटाणा, जि. नाशिक) येथे १० वर्षीय नाभिक समाजातील

अल्पवयीन बालिकेवर ७० वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत होता. या घटनेतील राक्षसी व हैवानी प्रवृत्तीच्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आणि कायद्याची भीती उरलेली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन अशा घटनांविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. पीडित बालिकेला तात्काळ न्याय मिळावा, आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा द्यावी, अशीही मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button