Uncategorized

आमदार जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा नाभिक समाजा कडून जाहीर निषेध

आमदार जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा नाभिक समाजा कडून जाहीर निषेध

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर :

प्रतिनिधी विनोद तायडे आमदार श्री जयवंतराव यांनी विधान सभेमध्ये नाभिक समाजाच्या व्यवसायाला उद्देशून अतिशय खालच्या पातळी वरती भाष्य केले व पोलिस प्रशासनाच्या संदर्भा मध्ये दखल देत असतांना त्यांनी नाभिक . समाजाच्या व्यवसाया चा उल्लेखचुकीच्या पद्धतीने केला आहे व असे म्हटले आहे की पोलिस प्रशासन हे हजामत्या करीत आहे का असे भाष्य विधान सभेत करुण नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत यावरूण असे समजले जात आहे की त्यांची तिरस्काराची भावना लक्षात घेऊन संपूर्ण समाज दुखावला आहे व एकीकडे असे म्हटले जाते की नाभिक समाजाला संतांचा वारसा आहे समाज प्रबोधनाचा वारसा आहे यातून संत शिरोमणी सेना महाराज सांगतात आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक आपल्या नाभिक ( न्हावी ) व्यवसायाचा रूपक वापरूण आध्यात्मिक शिकवण देतात आम्ही वारीक वारीक ( बारीक सुष्म ) काम करू आणि आणि हजामत बारीक अतिशय काळजीपूर्वक करू म्हणजे मनातील विकार , वाईट विचार आणि अहंकाराची स्वच्छता करू असा अर्थ आहे : यामध्ये विवेक आरसा , वैराग्य , चिमटा आणि शांती ( पाणी ) या साधनांचा वापर करुण आत्मशुध्दी कशी करावी हे सांगितले आहे इतक्या चांगल्या विचारांचा नाभिक समाज आणियाच नाभिक समाजाच्या कौशल्यात्मक व्यवसायाचा उच्चार करतांना सन्माननीय विधान सभेचे आमदार जयंत पाटिल यांनी फार खालच्या पातळीवर भाष्य केले व त्यांनी केलेली चूक हि त्यांच्या लक्षात आनून दिल्यावरही त्यांनी नाभिक समाजाचा केलेला अपमान त्यासाठी पावरले ले शब्द परत घेण्यास नकार दिला हि एक समाजा प्रती त्यांनी तिरस्काराची भावना द्वेषाची भावना प्रकट केली आहे यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ नाभिक संघ रावेर शहर रावेर तसेच संपूर्ण नाभिक समाज बांधवांच्या वतीने त्यांचा जाहिर निषेध करीत आहे व आमदार जयंत पाटील यांनी नाभिक समाजाला तात्काळ माफी मागावी असे दिलेल्या निवेदना द्वारे मागणी केली आहे सदर निवेदन रावेर पोलिस स्टेशन चे स .पो . नि . मिरा देशमुख यांना देण्यात आले निवेदन देत असतांना रावेर तालुका नाभिक समाज अध्यक्ष विकास आमोदकर उपाध्यक्ष : राहुल वरणकरतुषार जलंकर शब्बीर खलिका : शरिफ खलिफा / बाळा आमोदकरगौरव श्रीखंडे / सतिष भंजाळे / योगेश मावळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button