Uncategorized

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमसंपन्न

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमसंपन्न

..जी.डी.रोकडे तालुका प्रतिनिधी जणूना तालुका खामगाव येथे दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त व मानवी स्वतंत्र्याचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एक वही एक पेन हा संकल्प दिवस म्हणून पंचशील ्या क्रीडा मंडळ व बहुद्देशीय संस्थां यांच्या वतीने यावेळी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला हार अर्पण करून वंदना घेऊन पुढील कार्यक्रम अभिवादन चौक येथे घेण्यात आला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क बजाविण्याचा हक्क दिला अशा महामानवांचा विनम्र अभिवादन करण्यात आले. महामानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटं मौन धारण करून बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पित करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय पंचायत समिती सदस्य लक्ष्मण भाऊ हरमकर ज्येष्ठ नागरिक देवदास काका हरमकर जेष्ठ नागरीक विठोबा उखर्डे देवानंद शेजव मा.सरपंच सुडोकार ताई उपस्थित होते सूत्रसंचालन श्री बनसोडे सर यांनी केले आधारस्तंभ मा. सुनील भाऊ हेलोडे यांनी शिक्षणाबाबत आपले विचार मांडून विद्यार्थ्यांना नवचेतना आणण्याचे काम केले तर संदीप गोरे यांनी समाजकार्य किंवा गावात कार्यासाठी आपण देणारे झालो पाहिजे तर आपले गाव आदर्श होईल असे प्रबोधन केले तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात व महापुरुषांच्या पुष्पहार आपण करून करण्यात आली अध्यक्ष माननीय लक्ष्मण हरमकर यांचा सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला उपस्थित गावातील प्रमुख मंडळी तसेच शिक्षक वृंद शालेय विद्यार्थी उपस्थित होते त्यानंतर क्रीडा मंडळाने बहुद्देशी संस्था तर्फे एक वही पेन हा संकल्प 232 त्यांना महेंद्र ब्राह्मणे व सोनवणे यांच्यातर्फे राबविण्यात आला यावेळी तोंडे सर वासुदेव दाभाडे भिकाजी गव्हाणे यशवंत लोखंडे रमेश उबाळे देवानंद राजूभाऊ खंडेराव , इतर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते..✒️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button