बुलढाणामहाराष्ट्र
नांदुरा पुरवठा निरीक्षक पूनम थोरात लाज घेताना एसीबीच्या जाळ्यात…

नांदुरा पुरवठा निरीक्षक पूनम थोरात लाज घेताना एसीबीच्या जाळ्यात…
जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी
खामगाव, नांदुरा तालुका नांदुरा तहसीलच्या वादग्रस्त पुरवठा निरीक्षक अधिकारी पूनम थोरात यांना 16 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने कारवाई करीत अटक केली आहे. रेशनच्या दुकानावरील होत असलेली कारवाई थांबवण्यासाठी पुरवठा निरीक्षक अधिकारी पूनम थोरात यांनी लाच मागितली होती. एसीबीच्या कारवाईच्या आदेशाने एसीबी चे पथकाने सापळा रचून नांदुरा पुरवठा अधिकारी पूनम थोरात यांना 16000 चे लाज घेताना रंग हात पकडले व अटक केली. तसेच पूनम थोरात यांनी दिव्यांग अपंग घटकातील व्यक्ती यांना सुद्धा अंत्योदय योजनेच्या रेशन कार्ड बाबत त्रास देऊन पैशाची मागणी केली होती..



