खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुबईविदर्भहवामान अंदाज

मान्सूनचा जोर कायम : जळगाव व ठाणे जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा

स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस हवामान विभाग प्रतिनिधी

राज्यातील मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, हवामान विभागाने पुढील ३ तासांत जळगाव आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या दरम्यान विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी विजांचा प्रकोप वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर अनावश्यक फिरणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीमधील विद्युत उपकरणे आणि सिंचन यंत्रणा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.हवामान खात्याने विशेषतः ग्रामीण व किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button