लाडकी बहिण योजना समस्या निवारण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

हिवरखेड | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी हिवरखेड मंडळ तर्फे सेवा पंधरवडा सप्ताहाच्या निमित्ताने लाडकी बहिण योजना समस्या निवारण शिबिराचे दोन दिवसीय आयोजन (दि. 19 व 20 सप्टेंबर 2025) करण्यात आले. या शिबिरात लाडक्या बहिणींना आलेल्या अडचणींचे त्वरित निवारण करण्यात आले तसेच मागील काही महिन्यांपासून हप्ता न मिळालेल्या लाभार्थिनींचे हप्ते पुन्हा सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केले गेले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व लाडक्या बहिणींच्या स्वागताने करण्यात आली. शिबिराच्या आयोजनासाठी सौ. सुलभाताई रमेशजी दुतोंडे, सौ. गोकुळाताई महेंद्रजी भोपळे, सौ. प्रतिभाताई वीरेंद्रजी येऊल, सौ. वैशालिताई गणेशजी वानखडे, सौ. अनिताताई रवींद्रजी वाकोडे आदींनी पुढाकार घेतला.
यावेळी श्री रमेशजी दुतोंडे, श्री अनिलभाऊ कराळे, श्री रामदादा तिडके, श्री बजरंगजी तिडके, श्री किरणजी सेदानी, श्री मिलींदजी भोपळे, श्री महेंद्र कराळे सर, श्री प्रविणजी येऊल, श्री संदिपजी इंगळे, श्री गणेशजी वानखडे, श्री रविंद्रजी वाकोडे, श्री रविंद्रजी मानकर, श्री संजयजी हिवराळे, श्री दिलीपभाऊ नाठे, श्री सुदामदादा राऊत, अन्सारभाई, अजीजभाई यांच्यासह विविध कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार बाळासाहेब नेरकर, एकनाथ भोपळे, श्री संतोषजी शर्मा, श्री केशवराव कोरडे, मोहसीनभाई तसेच मंडळ अध्यक्ष मंगेश दुतोंडे, प्रथमेश नाठे, वैभव गावंडे, गौरव गावंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या शिबिरामुळे अनेक लाडक्या बहिणींच्या समस्या सोडवल्या गेल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा उपक्रमांमुळे योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



