खानदेशजळगावा जिल्हापत्रकारपुणेबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भशैक्षणिक

मानव विकासच्या बसेस – नियमभंगामुळे वादंग

मुक्ताईनगर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एस.टी.) मानव विकास योजनेअंतर्गत मुक्ताईनगर आगाराला दहा बसेस दिल्या आहेत. या बस केवळ मानव विकास योजनेतील मुलींच्या सुरक्षित प्रवासासाठी राखीव आहेत, तसेच प्रवासासाठी पासधारक मुलींचाच प्रवेश करण्याचा अधिनियम आहे.

मात्र, प्रत्यक्षात या बसमध्ये सर्वसामान्य प्रवासी व इतर विद्यार्थी देखील प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे. हे स्पष्टपणे नियमबाह्य असून, सुरक्षिततेचा मूळ हेतूच धोक्यात येत असल्याची टीका होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुक्ताईनगरातील जगजीवनदास इंग्लिश मीडियम स्कूल या शैक्षणिक संस्थेने वेळापत्रक बदलल्यामुळे मानव विकासच्या बसेसचा फेरा व विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात एस.टी. आगार प्रमुख कलाल यांनी शाळेच्या प्राचार्यांना पत्रव्यवहार केला. तथापि, वेळापत्रक बदलण्याबाबत शाळा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

याबाबत प्राचार्यांनी प्रतिक्रिया देताना, “आम्ही अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे काम करतो. वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार संस्थेचा आहे,” असे सांगितले.

शिक्षण विस्तार अधिकारी मोरे यांना यासंबंधी विचारले असता, “संस्था चालकांना वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार आहे. विस्तार अधिकारी म्हणून आम्ही त्यामध्ये थेट हस्तक्षेप करू शकत नाही,” असे उत्तर देऊन जबाबदारी झटकली.

दरम्यान, एस.टी. विभागाने शाळेच्या वेळा व बस शेड्युल यामध्ये विसंगती असल्याने पत्रव्यवहार करून पुन्हा वेळापत्रक बदलण्याची मागणी केली आहे.

संपादकीय दृष्टिकोन

मानव विकास योजना मुलींच्या सुरक्षित प्रवासासाठी आहे. अशा योजनांचा गैरवापर झाला तर त्या योजनेची गरजच संपुष्टात येते. शैक्षणिक संस्थांनी स्वतःच्या सोयीसाठी वेळा बदलून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अडचणीत आणणे हे दुर्दैवी आहे. शासनाने व एस.टी. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नियमबाह्य प्रवासावर निर्बंध आणावेत आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा उद्देश अबाधित राहील याची काळजी घ्यावी.


Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button