शिंदखेडा ता रावेर येथे डोळे तपासणी शिबिर संपन्न !

.
स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस रावेर
ता. प्रतिनिधी विनोद तायडे
शिंदखेडा गावातील हनुमान मंदिरा मध्ये नेत्रालय रावेर मार्फत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले व डोळ्यांची विविध प्रकारची तपासणी करण्यात आली जसे की डोके दुखी / डोळे चुळचुळ करणे / डोळे लाल होणे /सुईचे नाके बारीक कमी दिसणे व शिबि रा मध्ये मोतीबिंदू तपासणी करण्यात आली ही सर्व तपासणी जापानी कॉम्प्युटर मशिन द्वारे करण्यात आली तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही गणपती नेत्रालय रावेर येथे करण्यात येणार आहे सदर शिबिरा मध्ये (१०५) रुग्णांनी तपासणी केली व ज्या ज्या लोकांना चष्म्याची आवश्यकता आहे अशा लोकांना लवकरच कमी खर्चा मध्ये घरपोच सेवा दिली जाणार आहे तरी या शिबिराचे उद्घाटन शिंदखेडा गावचे सरपंच संगीता पाटील यांनी केले व शिबिरासाठी तपासणी साठी आलेले डॉ. शांताराम पाटील
डॉ गणेश पाटील
उपस्थित ग्रामपंचायत सदस्य
जिजाबाई चौधरी
अनिल पवार
पवन सोनार
तुकाराम नाटकर, राजू भाऊ पाटील, , नरेश तायडे, साहेबराव कानडे, अनिल पाटील , महेंद्र पाटील, इत्यादी ग्रामस्थ होते



