बुलढाणामहाराष्ट्र

जय गुरुदेव सांप्रदायिक भजनी मंडळाचा सामाजिक प्रबोधन वर भजन…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी अरुणा खंडागळे चिखली

चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील जय गुरुदेव सांप्रदायिक भजनी मंडळाचा सामाजिक प्रबोधन पर थोडस व पळसखेड सपकाळ येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये भजन सेवा आज महाराष्ट्रातील प्रत्येक गाव खेड्यात भजनी मंडळ पाहायला मिळते भजन कीर्तन यातून समाजाचे प्रबोधन करत असतात. चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ श्री गुरुदेव आश्रम या ठिकाणी वर्षभरातून अनेक कीर्तनाचे व धार्मिक कार्यक्रम होत असतात. यामध्ये जय गुरुदेव सांप्रदायिक भजनी मंडळ आपली कीर्तन सेवे मध्ये सहभागी होत असतात व श्री संत गजानन महाराज शेगाव नगरी येथे दरवर्षी श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाला व गोकुळ अष्टमीला पळसखेड सपकाळ येथून पायी दिंडी नेत असतात तसेच गावातील व बाहेरगावी पाचवी व बारादि निमित्य भजन सेवा देत असतात. जय गुरुदेव सांप्रदायिक भजनी मंडळ गणेश उत्सव निमित्य दिनांक 27 ऑगस्ट पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत दररोज रात्री नऊ वाजेपर्यंत ते रात्री एक वाजेपर्यंत भजनी मंडळ थोडस व पळसखेड सपकाळ येथील सार्वजनिक गणेश मंडळातील गणपती येथे नऊ दहा दिवसापासून जय गुरुदेव सांप्रदायिक गणेश भजनी मंडळ भजन सेवा देत आहे. या भजनी मंडळामध्ये पळसखेड सपकाळ येथील ह भ प अशोक सपकाळ, ह भ प विष्णु अंधारे, ह भ प विनोद कापसे, ह भ प विष्णू सपकाळ, ह भ प रंगनाथ कुसुंबे, ह भ प अर्णव सपकाळ, ह भ प श्रीकृष्ण कापसे, ह भ प पृथ्वीराज सपकाळ, ह भ प मंगल काळे, ही मंडळी निमित्याने आपली सेवा देत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button