खानदेशजळगावा जिल्हाशैक्षणिक

विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध जपून समाजासाठी कार्य करावे : माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे प्रतिपादन

जनविश्वास सप्ताहानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे प्रज्ञावंतांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा

मुक्ताईनगर-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात साजऱ्या होत असलेल्या जनविश्वास सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात गुरुवार दि. ३१ जुलै रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ‘प्रज्ञावंतांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला होता.
चांगल्या संगतीत राहून, ध्येय निश्चित ठेवून, अभ्यासात जिद्द आणि सातत्य राखले तर गुणवत्ता निर्माण होते. मात्र यासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा, शिक्षक व पालकांविषयी ऋणानुबंध जपले पाहिजेत आणि समाजासाठी योगदान द्यावे, असे विचार माजी मंत्री मा. गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात देवकर यांनी युवा पिढीला योग्य दिशा दाखवत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून युवती आणि विद्यार्थ्यांसाठी संघटनेच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमास व्यासपीठावर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण पाटील, वाल्मीक मामा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष गोपाळ पाटील, आसिफ बागवान, जिल्हा सरचिटणीस विजय सोनार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, तसेच बोदवड तालुकाध्यक्ष निवृत्ती ढोले हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी 500 विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अश्विन सुरवाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान दूट्टे यांनी मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button