सायबर सुरक्षा जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

चांगदेव, ता. मुक्ताईनगर्।
वार्ताहर
श्री एस . बी चौधरी माध्यमिक विद्यालय, चांगदेव येथे इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ . स्वाती चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सत्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील विद्यार्थि भाग्यश्री बढे, प्रांजल मराठे, अमृता कोळी यांनी Quick Heal Foundation च्या Cyber Warrior उपक्र मांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव याविषयी मार्गदर्शन केले.
संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्राला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या शेवटी मा.आर.वाय. सोनवने सर यांनी मार्गदर्शकांचे आभार मानत विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला.



