बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भर रस्त्यावर अल्पवयीन मुलीची छेड कारून जीव मारण्याची धमकी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून व तिचा हात पकडून तिचेवर लग्नासाठी दबाव टाकल्याप्रकरणी येथील शहर पोलीस स्टेशनला एका युवकाविरूध्द पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, शहरातील एका परिसरातील १७ वर्षीय पिडीत मुलगी १५ मे रोजी सायंकाळी
क्लास आटोपून घरी जात होती. त्यावेळी एका पेट्रोल पंपाजवळ २४ वर्षीय आरोपीने पिडीतेचा हात पकडून माझ्याशी लग्न कर असे म्हणत तिचावर दबाव टाकला. पिडीतेने विरोध करून हात झटकताच आरोपीने माझ्याशी बोलली नाहीस तर तुला आणि तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिल्याची तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीवरून आरोपीविरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ७८, ३५१ (२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ संजय करूटले यांनी फिर्याद नोंदविली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बरिंगे हे करित आहे ✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button