भीषण अपघात एरंडोल येथे एसटी बस नाल्यात पलटी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आज एरंडोल–कासोदा मार्गावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या MH 20 BL 3402 क्रमांकाच्या एरंडोल-भडगाव मार्गावरील एस.टी. बसचा अपघात झाला असून बस नाल्यात पलटी झाली आहे. अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून, क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस, अँब्युलन्स आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. एक प्रवाशाचे दुर्दैवी निधन झाले असून,15 गंभीर जखमी प्रवासी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहेत, तर 35 किरकोळ जखमींवर एरंडोल येथे प्राथमिक उपचार सुरू आहेत. प्रशासन या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासन जखमी प्रवाशांच्या तातडीच्या उपचारासाठी व त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी कटिबद्ध आहे.



