अकोलाअहमदनगरखानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगरमुबईविदर्भशैक्षणिक
पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल येथे टीव्ही ची तोडफोड…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद
आसलगाव येथील पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल मधील अंदाजे एक ते दीड लाख रुपये किमतीच्या टीव्हीची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना दिनांक 27 जुलै रोजी घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुलांना शिकविण्याकरता शासनाकडून एलईडी टीव्ही जिल्हा परिषद हायस्कूल ला देण्यात आली होती. सदर टीव्ही ची किंमत अंदाजे जवळपास एक ते दीड लाख रुपये इतकी असून त्यासोबत टीव्हीला असलेले स्पीकर सुद्धा चोरून नेले. व असलेल्या सामानाची नाश सुद्धा अज्ञात इसमानाकडून करण्यात आली. त्यामुळे शाळा असुरक्षित दिसून येत आहे. काही समाजकंटकाकडून हेतू पुरस्कार मुलांचे शैक्षणिक नुकसान करण्यात आले. त्यामुळे गावकऱ्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
✍️



