खानदेशमहाराष्ट्रमुबई

कै . लक्ष्मण शंकर म्हात्रे यांच्या जंयती निमित्त शिवदत्त ज्ञानप्रसारक मंडळ संचलित व रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य शिबीर व नेत्र चिकित्सा मोफत चष्मा वाटप

दिवा – ( सचिन शेलवले ) शुक्रवार दिनांक 1/8/2025 रोजी सकाळी ठिक १० ते दुपारी १ वाजेपर्यंत नविन ईमारतीत कै . लक्ष्मण शंकर म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त शिवदत्त ज्ञानप्रसारक मंडळ संचलित व रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या विद्यमाने मोफत भव्य आरोग्य शिबिर व नेत्र चिकित्सा मोफत चष्मा वाटप यांचे आयोजन करण्यात आले . याचा फायदा दिवा पंचक्रोशितील नागरीकांना घेतला . या शिबिराला दिवा वासियांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला . हरे कृष्णा मानव कल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याकडुन विविध आजारांवर मोफत तपासणी झाली . त्यासाठी त्यांनी हॉस्पीटल कडुन अनेक डॉक्टर तझांची नेमणूक केली होती . त्यांचे मोलाचे विनामुल्य सहकार्य लाभले . तसेच संगणक कक्षाला नविन 30 संगणक देऊन शाळेच्या अध्यक्षा श्रीमती लिलावती लक्ष्मण म्हात्रे यांच्या हस्ते संगणक कक्षाचा लोकार्पण सोहळा पार पाडला . इयत्ता दहावीच्या 350 विद्यार्थ्यांना मोफत स्टडी अँप व मोफत वापरासाठी इव्ही रूम देण्यात आली . तसेच शिवदत्त ज्ञानप्रसारक .मंडळाचे पदाधिकारी व रोटरी क्लब यांचे पदाधिकारी यांचे बहुमुल्य श्रेय या कार्यक्रमास लाभले . या उपक्रमास क्लब टायटन अध्यक्ष किशोर पाटील व क्लब सचिव स्वप्निल गायकर, खजिनदार विकास गुंजाळ, नवनीत पाटील माजी अध्यक्ष अभिषेक ठाकुर आणि साईनाथ म्हात्रे, माजी सचिव अंकुर मुंडे आणि प्रकल्प प्रमुख प्रतीक बेडेकर यांची विशेष उपस्थिती लाभली .तसेच या कार्यक्रमासाठी श्री गणेशविद्यामंदिर या शालेतील सर्व शिक्षक वृंदांचे सुद्धा सहकार्य लाभले . सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button