Uncategorized

मराठी पत्रकार परिषद तालुका कार्यालयाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण

मराठी पत्रकार परिषद तालुका कार्यालयाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी भगवान पाखरे

संग्रामपुर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरवट बकाल येथे मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नीत संग्रामपुर तालुका पत्रकार संघ कार्यालयाचे उद्घाटन आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 19 जुलै रोजी संपन्न झाला याप्रसंगी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितभाई राजपुत,कार्याध्यक्ष प्रशांतभाई देशमुख,वसिमभाई शेख आणि जिल्हासचिव शिवाजीराव मामनकर,जिल्हा समन्वयक पंजाबरावभाई ठाकरे,सत्यशोधन समिती जिल्हा कार्याध्यक्ष अझहरभाई अली यांची प्रमुख उपस्थिती होती संग्रामपुर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दांदळे यांनी प्रस्तावना करतांना कार्यालय स्थापनेचा उद्देश आणि संघटनेच्या पुढील कामाची रुपरेषा विषद केली. जेष्ठ पत्रकार वासुदेवराव दामधर यांनी पत्रकारीतेतील आवाहनांवर पत्रकारांना संबोधित केले तर जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे यांनी पत्रकारांनी संघटीत राहुन व आवाहने पेलत तळागाळातील सामाजिक समस्या समर्थपणे मांडत पत्रकारीता करण्याचे आवाहन केले जिल्हाध्यक्ष रणजितभाई राजपुत यांनी पत्रकारांच्या आरोग्य विषयक समस्यांसाठी संघटनेकडुन सहकार्याच्या योजनेविषयी आपले विचार मांडले तर पुढे त्यांनी पत्रकारीतेतील पुरस्कारांविषयी विचार मंथन सुरु असल्याचे सांगतानाच तालुका पत्रकार संघाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. आपल्या मार्गदर्शनात जिल्हा कार्याध्यक्षद्वय प्रशांतभाई देशमुख आणि वसिमभाई शेख यांनी संग्रामपुर तालुका पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा घेतांना एकजुटीचा गौरवपुर्ण शब्दात उल्लेख केला.या कार्यक्रमाचे सुयोग्य सुत्रसंचालन जिल्हा समिती सदस्य श्यामभाऊ देशमुख यांनी केले तर आभार तालुका सचिव विवेक राऊत यांनी व्यक्त केले.कार्यालयाचे उद्घाटना नंतर जवळील विश्वकर्मा मंदिराच्या पटांगणावर वृक्षारोपण करण्यात आले व चहा फराळाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमासाठी तालुका सहसचिव शेख रफिकभाई यांचेसह डिजीटल मिडीया तालुकाध्यक्ष गोपाल धर्माळ,उपाध्यक्ष भगवान पाखरे,स्वप्निलबापु देशमुख,आकाश पालिवाल,मोहन सोनोने,निलेश तायडे,श्यामभाऊ ईंगळे,राजेंद्र धर्माधिकारी यांचे सह संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button