बुलढाणामहाराष्ट्र

राष्ट्रीय सेवा योजना प्लास्टिक निर्मूलन अभियान रॅली संपन्न….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद

त्रिमूर्ती कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव बाजार तालुका जळगाव जामोद च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे दिनांक 19 जुलै शनिवार रोजी प्लास्टिक निर्मूलन अभियान प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना प्लास्टिकचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. त्यानंतर गावातून प्रभात फेरीच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. विविध घोषणांच्याद्वारे प्रबोधन करण्यात आले. राष्ट्रीय समाज योजना युनिटच्या विद्यार्थ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. यामध्ये कुमारी नेहा वाकोडे, तेजस्विनी लहासे, कुमारी अश्विनी गावंडे कु साक्षी जाधव, दिव्या पाखरे, सौरभ जाधव, सुपेस गावंडे, आनंद वानखडे, यांनी विशेष पुढाकार घेतला यावेळी प्राचार्य विद्या काटले,प्रा सुप्रिया इंगळे,प्रा महेश्वरी वाघमारे,प्रा योगेश वारुकार, प्रा रवींद्र निमकडे, व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा शरद गावंडे उपस्थित होते.
✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button