पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश.!अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नेते व कार्यकर्ते रा. काँ. पक्षात सामील ! ; अजित पवार उप मुख्यमंत्री

हिवरखेड नगरपरिषद निवडणुकीत नवीन समीकरणे दिसणार ?
हिवरखेड :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये हिवरखेड चे माजी सरपंच सुरेश ओंकारे तसेच त्यांची मुलगी ग्रामपंचायत माजी सदस्य आचल ओंकारे यांचेसह अकोला जिल्ह्यातील विविध पक्ष व संघटनांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भव्य पक्षप्रवेश केला आहे. जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शिंदे सेना तसेच अनेक स्थानिक संघटनांतील जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष मो. बद्रुजम्मा यांच्यासह आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार नायकवाडी, माजी आमदार अतुल बेनके, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या भव्य पक्षप्रवेशामुळे अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून पातूर, बार्शीटाकळी, बाळापूर, तेल्हारा येथील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षात दाखल झाले आहेत. एमसीए द लाउंज, वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे अकोला जिल्ह्यातील अनेक नेत्यांसह हिवरखेड चे माजी सरपंच सुरेश ओंकारे, आणि त्यांची मुलगी ग्रामपंचायत सदस्य आचल ओंकारे यांनी आमदार अमोल मिटकरी यांचे नेतृत्वात कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला.
सुरेश ओंकारे यांचे वडील वसंतराव ओंकारे हे जिल्हा परिषद अकोला चे माजी सदस्य आहेत. तर सुरेश ओंकारे आणि त्यांच्या पत्नी या दोघांनीही हिवरखेडचे सरपंच पद भूषविलेले आहे. तर त्यांची मुलगी आचल सुद्धा माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. ओंकारे कुटुंबीयांना राजकारणाचा दांडगा अनुभव असल्याने ओंकारे कुटुंबीयांच्या पक्ष प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच हिवरखेड नगर परिषद च्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. “विदर्भ व अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीचा जनाधार वाढत असून, पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हार्दिक स्वागत करून पुढील वाटचालीसाठी मा.अजितदादांनी शुभेच्छा दिल्या .



