महाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगरमध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई: हातावर पोट भरणाऱ्यांवरच कारवाई?

मुक्ताईनगर, ता. २७ मे — मुक्ताईनगर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने प्रवर्तन चौकातील रहदारीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आल्याचे दिसत असले तरी, या मोहिमेत फक्त हातावर पोट भरणाऱ्या लघु विक्रेत्यांवरच कारवाई केली जात असल्याची जोरदार चर्चा आहे.

शहरातील ग्रीन झोनमध्ये स्थायिक असलेल्या पक्क्या RCC दुकानांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. विशेषतः प्रवर्तन चौक परिसरातील काही प्रतिष्ठित दुकानदारांचे अतिक्रमण आजही तसेच असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे प्रशासनाची कारवाई निवडक असून ती गरिबांच्या विरोधातच केंद्रित असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रेस्ट हाऊसजवळील परिसर, सहा नंबर हॅवे परिसर आणि भाजी मंडी परिसरात हातगाड्या व टपऱ्या लावणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली. मात्र त्याच भागातील पक्क्या व मोठ्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

मुख्याधिकारी फक्त गरीब, हातावर पोट भरणाऱ्या अतिक्रमणधारकांवरच कारवाई करत आहेत का? पक्क्या दुकानदारांवर कारवाई करण्याची हिंमत प्रशासन दाखवणार की नाही, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

या सगळ्या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या कारवाईचा पुन्हा एकदा निष्पक्षतेने आढावा घेण्याची मागणी होत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button