महाराष्ट्रसामाजिक

रात्री कीर्तनात सहभाग आणि सकाळी थेट मृत्यूची बातमी,

रात्री कीर्तनात सहभाग आणि सकाळी थेट मृत्यूची बातमी,

…..आणि नामदेव महाजन यांचे रात्रीचे कीर्तन ठरले अखेरचे कजगाव ता.भडगाव:मृत्यूला अंतिम सत्य समजले जाते त्यामुळे मृत्यूं केव्हा, कुठे, कसा, येईल याचे उत्तर कोणाकडे ही नाही मृत्यू यायचाच झाला तर तो कुठेही येऊ शकतो आणि नियतीला मान्य असलेला मृत्यू काळ, वेळ,परिस्थिती आणि वय याची कुठलीच अट न ठेवता झडप घालून चालत्या फिरत्या माणसाला घेऊन जातो आणि तसेच उदाहरण कजगाव येथे मध्यरात्री घडले आहेयाबाबत सविस्तर माहीत अशी की कजगाव येथील रहिवासी नामदेव संतोष महाजन यांनी रात्री सावता महाराज मंदिरात असलेल्या हरिनाम कीर्तन सप्ताच्या कार्यक्रमात टाळकरी म्हणून कीर्तनकार महाराजांच्या बरोबर सहभाग घेतला रात्री अकरा वाजेपर्यंत ह.भ.प. सावता महाराज मोहाडीकर, यांचे पहिलेच कीर्तन होते आणि त्यांच्या कीर्तनात महाराजांच्या मागे असलेले नामदेव महाजन यांनी रात्री अकरा वाजेपर्यंत किर्तनांत भजनी मंडळ व टाळकरी सहकाऱ्यांसोबत टाळकरी म्हणून कीर्तनकारांना साथ दिली आणि कीर्तन समाप्ती नंतर कार्यक्रम आटोपून रात्री बारा वाजेच्या दरम्यान आपल्या घराकडे गेले घरी जाऊन जेवण करून काही वेळ रस्त्यावर पाय मोकळे करण्यासाठी फिरले आणि फिरून घरी आल्यावर रात्री उशीरा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने गावातील खाजगी डॉक्टरांनी तपासणी केली व पुढील उपचारासाठी त्यांना चाळीगाव येथे नेण्यात आले व चाळीसगाव येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि अवघ्या दोनच तासांत होत्याचे नव्हते झाले त्यांच्या मृत्यूने अनेकांना धक्काच बसला नेहमी कीर्तनात टाळकरी म्हणून सहभाग घेणाऱ्या महाजन यांच्या मृत्यूने कजगाव परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी, सून,नातवंडे असा परिवार आहे मंगळवारी दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button