संविधानामुळेच देश एकसंघ राहिला – ॲड. संदीप वर्पे यांचे प्रतिपादन…कोपरगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)तर्फे अभिवादन कार्यक्रम…

कोपरगाव किसन पवार :
“संविधान हाच देशाचा खरा पाया आहे. १८ पगड जाती व अनेक धर्म असूनही देश एकसंघ राहिला, याचे संपूर्ण श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला जाते,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. संदीप वर्पे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी ॲड. वर्पे बोलत होते.
यावेळी तालुका उपाध्यक्ष सुरेश आसने, संतोष वढणे, शहराध्यक्ष गौतम बनसोडे, उपाध्यक्ष शुभम शिंदे, युवक शहराध्यक्ष स्वप्नील पवार, कार्याध्यक्ष रिंकू मगर, शहर उपाध्यक्ष दिनेश पवार, याकूब अत्तार, आसिफ शेख, योगेश डोखे, मोबीन शेख, पंकज पवार, फहीम शेख, नईम शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“आज देशात सामाजिक ऐक्य, बंधुता आणि लोकशाही टिकून आहे, त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दूरदृष्टीपूर्ण विचार आहेत. त्यांचे कार्य हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे,” असेही ॲड. वर्पे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.



