जळगावा जिल्हामहाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तेल्हारा येथे शिवसेना पक्षाची आढावा बैठक संपन्न!ग्रामीण भागातील पक्ष प्रवेशतालुक्यात शिवसेना भक्कम!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी

तेल्हारा दि. १० एप्रिल |

स्थानिक शासकीय विश्रामगृह तेल्हारा येथे काल दि. ९ एप्रिल २०२५ रोजी शिवसेनेचे मुख्य नेते ना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख तथा उपनेते मा.आमदार गोपीकीशन बाजोरिया यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकार यांच्या नेतृत्वाखाली
आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि संघटन बांधणी यासंबंधी शिवसेना पक्षाची आढावा बैठक उत्साहात पार पडली.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकार निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष अनासने, उप जिल्हाप्रमुख मनिष कराळे, जिल्हा सचिव सतिष गोपनारायण ,अकोला शहर संघटक राजेश पिंजरकर , युवा सेना उपजिल्हाप्रमुख विशाल चौधरी अकोट इत्यादी मान्यवरांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व संघटन बांधणी विषयी बैठकीला मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनात तेल्हारा तालुका प्रमुख प्रविण वैष्णव , शहर प्रमुख अनिकेत ढवळे यांच्या नेतृत्वाखाली
हिवरखेड दिपक हिवराळे , दानापुर दिनेश विखे , सचिन नांदुरकार यांच्या सह तालुक्यातुन अनेकांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला.

शिवसेना जिल्ह्याप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी आपल्या संबोधनातुन
या बैठकीमध्ये आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच पक्ष संघटना कशी मजबूत करता येईल या विषयावर अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. महायुती सरकारच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली
सामान्य जनतेच्या हितासाठी ज्या सरकारी योजना राबवल्या आहेत त्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या अनुषंगाने योजनेचा प्रचार आणि प्रसार पक्षाच्या वतीने कसा करता येईल आणि सामान्य जनतेला त्या योजनेचा कसा लाभ होईल यावर सुद्धा एक महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
यावेळी प्रत्येक पदाधिकारी यांच्याकडून आजपर्यंत केलेल्या
संपूर्ण कामाचा लेखा-जोखा घेण्यात आला शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक करीता तत्पर रहा असे आदेश देण्यात आले.

या प्रसंगी प्रकाश पाटील चिकटे उप.तालुकाप्रमुख बेलखेड सर्कल , आदीत्य अग्रवाल उप.तालुकाप्रमुख भांबेरी सर्कल
, वासुदेव निंबोकार हिवरखेड ,
विक्की वाघ जि.प.सर्कल प्रमुख भांबेरी, प्रमोद निळे हिवरखेड शहर प्रमुख , रघुनाथ विखे दानापुर सर्कल , कीशोर नेरकर भांबेरी , प्रकाश वानखेडे दापुरा , गोपाल आमले माळेगाव ,
निखिल हिवराळे उप.शहरप्रमुख
, राम सुलाखे , मयुर वर्मा , पंकज वाडेकर , आकश जसनपुरे, ज्ञानेश्वर ढेंगे ,अनिकेत अवचार , ओम जऊडकार , शुभम खंडारे , शुभम इंगळे , प्रमोद भोंगरे , रविंद्र हिसवत , दिनेश शर्मा , राजेश गावत्रे , सुनील निंबोकार , अक्षय वानखडे , प्रशांत गावत्रे , राजेश ढोले , विशाल ठाकरे , गजानन गव्हाळे , प्रतिक वानखेडे , शुभम खिरय्या , चैतन्य भोजने , शिवराम गिरी , उदय पळसकार यांच्या सह तेल्हारा तालुका व शहरातील आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या आढावा बैठकीमध्ये कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेल्हारा तालुका प्रमुख प्रविण वैष्णव यांनी केले तर सुत्र संचालन प्रतिक पखान व आभार प्रदर्शन शहर प्रमुख अनिकेत ढवळे यांनी केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button