महाराष्ट्रविदर्भ

अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत व्यावसायीक रमन चांडक यांची निर्घृण हत्या !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय मनोहरराव घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोट. दि.8- एप्रिल 2025 ग्रामीण पोलीस स्टेशन अकोट हद्दीत पोपटखेड मार्गावरील शेत-शिवारात आज सकाळी एक गंभीर घटना उघडकीस आली असून अकोला येथील प्रसिद्ध व्यवसायिक रमण चांडक यांची निर्घृण हत्या झाली असल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांची हत्या झाली असल्याची हि धक्कादायक बातमी असून या प्रकरणात गजानन साहेबराव रेळे याला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की ,अकोट तालुक्यातील पोपटखेड लगत बंद पडलेला हड्डी कारखाना असुन डंपिंग ग्राऊंड जवळ पणज येथील व्यवसायीक हल्ली मुक्काम अकोला येथे असलेले रमन चांडक यांचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. रमन चांडक यांची हत्या झाल्याचे अकोट ग्रामीण पोलीसांनी निष्पन्न केले असुन पोलीसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. अकोट ग्रामीण पोलिसांकडून संशयास्पद एका आरोपीस चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले असुन त्या कडून चौकशी सुरू आहे. सदर हत्या हा आर्थिक देवाण-घेवाणीतुन झाली असल्याची माहिती वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली आहे. महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरागेंच्या कुशीत वसलेल्या अकोट पोपटखेड मार्गावरील पोपटखेड शेत-शिवारात बंद पडलेल्या अवस्थेत असलेल्या जनावरांच्या हाडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याच्या इमारतीमध्ये मृतदेह स्थानिक लोकांना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच सर्व प्रथम अकोट ग्रामीण पोलिसांनी हा खूनच झाल्याचे निष्पन्न करुन त्या दिशेने पोलीसांनी तपास सुरू केला. सदर मृतदेह हा अकोट तालुक्यातील पणज येथील मुळचे रहिवाशी व हल्ली आकोला येथे वास्तव्यास गेलेले व्यवसायिक रमन चांडक नामक इसमाचा असुन त्यांची हत्या झाल्याची ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सदर हत्या हि
आर्थिक देवाण-घेवाणीतून झाली असल्याची शक्यता वर्तविल्या जात असून पोलिसांनी संशयाच्या आधारावर एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सदर मृतदेह हा तपासणी साठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून अकोट ग्रामीण पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध हत्तेचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात हत्याचे दिशेने अकोट ग्रामीण पोलीसांचा तपास सुरु आहे. लवकरच सत्य माहिती पोलीसांकडून जनते समोर आणल्या जाईल व आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास ठाणेदार किशोर जुनघरे यांनी व्यक्त केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button