तेल्हारा येथील दोन बुद्धिबळ खेळाडू यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त !

तेल्हारा.
अमरावती येथे दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या दुसऱ्या जलदगती जी एच रायसोनी मेमोरियल इंटरनॅशनल फीडे रॅपिड रेटिंग चेस टूर्नामेंट 2025 मध्ये सहभाग घेतला होता यांचे निकाल ऑल इंडिया चेस फेडरेशन यांनी 28 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या वेबसाईटवर जाहीर केले या स्पर्धेमध्ये देशातील सर्व राज्यातील बुद्धीबळ पट्टू नी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला होता याच स्पर्धेमध्ये तेल्हारा येथील जीनियस चेस अकॅडमी चा खेळाडू यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये राज पंकज भारसाकळे वय 12 वर्ष याने उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाचे प्रदर्शन करीत देशातील मोठमोठ्या रेटेट बुद्धिबळपट्टूना पराभूत करीत दमदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय मानांकन घेत 1404 रेटिंग घेऊन प्राप्त केले आहे तसेच या स्पर्धेमध्ये तेल्हारा येथीलच मोहित जितेंद्र भैय्या वय 15 वर्षे याने सुद्धा दमदार कामगिरी करीत आपल्या बुद्धिबळ कौशल्य दाखवीत 1473 रेटिंग घेऊन आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले आहे तसेच मागील वर्षी जीनियस चेस अकॅडमी चा विद्यार्थी रेटेट खेडाळू चिन्मय अनुप उंबरकर यांनी सुद्धा आपली रेटिंग 1456 कायम ठेवत आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत ट्रॉफी घेऊन बहुमान मिळविला आहे त्यांच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून ते त्यांचे या यशाचे जीनियस चेस अकॅडमी तेल्हाराचे संचालक प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू बाळासाहेब बोदळे सर यांच्यासह त्यांचे आई-वडील तसेच गुरुजनांना शालेय शिक्षकांना देत आहेत



