युवकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचे संरक्षण करावे- मा. गिरीश वखारे (तहसीलदार, मुक्ताईनगर)

प्रतिनिधी
युवकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचे संरक्षण करावे- मा. गिरीश वखारे (तहसीलदार, मुक्ताईनगर)
श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दिनांक २३ जानेवारी 2025 रोजी वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धे प्रसंगी उद्घाटक म्हणून माननीय श्री. गिरीश वखारे (तहसीलदार, मुक्ताईनगर) यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व विशद करून उपस्थित त्यांना मतदानाचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. ए. महाजन होते, त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून लोकशाहीतील मतदानाचे असणारे अनन्य साधारण महत्व पटवून दिले. याप्रसंगी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कु. धनश्री नारखेडे (प्रथम क्रमांक), प्रवीण राठोड (द्वितीय क्रमांक) तर कु. कोमल चव्हाण (तृतीय क्रमांक) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तर रांगोळी स्पर्धेत कु. ममता डहाके व कोमल चव्हाण (प्रथम क्रमांक), कु. काजल महाले व अश्विनी कऱ्हाड (द्वितीय क्रमांक) तर कु.नेहा पाटील व वेदिका सुरवाडे (तृतीय क्रमांक) या स्पर्धकांनी यश संपादन केले. या स्पर्धेप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. नायब तहसीलदार श्री प्रदीप झांबरे यांची उपस्थिती होती. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा. सौ. एस.ए. देशमुख (वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख) , डॉ. छाया खर्चे (मराठी विभाग), डॉ. कृष्णा गायकवाड (हिंदी विभाग प्रमुख), डॉ. एस.डी. चाटे (प्राणीशास्त्र विभाग) यांनी केले. स्पर्धेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. दीपक बावस्कर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.ताहिरा मीर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी वक्तृत्व स्पर्धेत ११ स्पर्धकांनी तर रांगोळी स्पर्धेत १६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजीव साळवे, प्राध्यापक वृंद कर्मचारी वृंद व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.



