जळगावा जिल्हा

पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतील अपहार प्रकरणी वडोदा येथील ग्राम विकास अधिकारी निलंबित..

कु ऱ्हा काकोडा मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी विजय सातव यांनी जुलै 2023 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये ग्रामपंचायत मिळालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार केल्याप्रकरणी 17 जानेवारी रोजी पंचायत समितीच्या गट गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी सातव्या यांना निलंबित केले सातव यांच्याकडील कारभार कुऱ्हा येथील ग्राम विकास अधिकारी शंकर इंगळे यांच्याकडे देण्यात आलेला आहे या प्रकरणी वडोदा ग्रामपंचायतच्या उपसरपंच रंजना कोथळकर व प्रदीप हरिदास कोथळकर यांनी वारंवार गट विकास अधिकारी मुक्ताईनगर यांच्याकडे तक्रारी व चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे गट विकास अधिकारी निशा जाधव यांनी 17 जानेवारी रोजी निलंबनाची कारवाई केली आहे. गावामध्ये रस्ता काँक्रिटीकरण गटार ढापे एलईडी लाईट गावतळी खोलीकरण या कामाचे पैसे काढले असून प्रत्यक्षात कामे झालेली नसल्याची तक्रार होती. कुऱ्हा वडोदा परिसरातील बऱ्याच ठिकाणी पंधरावा वित्त आयोगाचा निधी योग्य वापरण्यात आला किंवा नाही याची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहे..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button