बुलढाणामलकापूर

उपक्रमशील शिक्षकांचा विनोबा ॲप मधील उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान

मलकापूर प्रतिनिधी (शेख निसार):- जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲप च्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहन पर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

डिसेंबर महिन्यातील जिल्हा स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ सौ सुनिता सुरेश सैंदाणे जि प मराठी शाळा हिंगणा काझी, श्री सुरेश आत्माराम सैंदाणे सर जि प मराठी शाळा हिंगणा काझी, सौ मंजुषा कुलकर्णी, सौ संगीता सनप आणि श्री गणेश राऊत सर तसेच महावाचन विजेते सौ रंजना सोनवणे आणि श्री सुरेश उतपुरे
सर तसेच उपक्रमशील कार्य करत असलेले केंद्र हिवरखेड, जनुना, किनोळा, खेरडा, सोनाळा आणि शेंबा बुद्रुक
सोबतच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ज्या शाळेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेला आहे अशा शाळा यांना मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गुलाबराव खरात साहेब , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बी एम मोहन साहेब, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री प्रकाश राठोड साहेब , उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीआशिष पवार साहेब, शिक्षणाधिकारी श्री खरात साहेब , शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीअनिल आकाळ साहेब, योजना शिक्षणाधिकारी वैशाली ठग मॅडम, उपशिक्षणाधिकारी श्री अनिल देवकर साहेब, उपशिक्षणाधिकारी श्री उमेश जैन साहेब , डायट प्रिन्सिपल मा .भटकर साहेब , सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तसेच इतर डायट अधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे शिक्षकांना आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाला सदरील पुरस्कार देताना जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व केंद्रप्रमुख सर सोबतच विस्तार अधिकारी तथा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमाचे कार्यक्रम समन्वयक वानखेडे सर , जिल्हा समन्वयक नजीर शेख ,अजय राठोड उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button