Uncategorized

विद्यार्थी शिक्षीत करण्यापेक्षा तो सुसंस्कृत कसा होईल हे शिक्षकापुढील आव्हानात्मक काम -रतन अघमकर

वाशिम (अजय गायकवाड )

मालेगाव : विषय शिकवीण्या पेक्षा माणूस कसा निर्माण करावा हा शिक्षकांच्या दृष्टीने आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी शिक्षीत करण्यापेक्षा तो सुसंस्कृत कसा होईल होईल हे शिक्षका पुढील आव्हानात्मक काम पेलूनच भावी समाज घडविण्यासाठी शिक्षक नेहमी धडपडत असतो. असे विचार सेवानिवृत्त मुख्याध्यापक रतन अघमकर यांनी व्यक्त केले.
ते मुंदडा व विद्यालयातील सन १९८८ च्या बॅच चे माजी विद्यार्थ्यांनी ३६ वर्षांनंतर एकत्र येऊन एका विशेष ‘कृतार्थ सोहळ्या’ चे आयोजन समारंभात बोलत होते.या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शामसुंदर मुंदडा यांचे सह उपस्थित सर्वच शिक्षकांनी थोडक्यात आपले अनुभव कथन केले.
या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शामसुंदर मुंदडा, राम मुंदडा, हिम्मत देवकते, एकनाथ पाटील, श्रीकिसन मानधने (Shirkisan Mandhane ), नारायण मारू,रतन अघमकर, मनोहर डोले, शिवराम पडघान, पुरूषोत्तम मुंदडा, सुधाकर पखाले, गणपत चव्हाण, प्रा.पुंडलिक खिराडे, दिनेश उंटवाल, मनकर्णा तायडे सदार,श्रध्दा देशमुख हे शिक्षक उपस्थित होते.
या सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले १२ जानेवारी रविवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद जयंती युवक दिनी हे जुने मित्र-मैत्रिणीच्या पुन्हा भेटीसाठी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळातील आपल्या शिक्षकांचा ‘हृदय सत्कार’ करण्यात आला. दिवसभर विविध सांस्कृतिक, मनोरंजक कार्यक्रम आणि जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या दैनंदीन कामाच्या व्यापातून वेळ काढून धमाल मस्ती करीत हा दिवस साजरा केला.
या सोहळ्याचे संचालन नितीन कुळकर्णी, प्रास्ताविक उदय देशमुख यांनी केले तर यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना रतन अघमकर, अरविंद देशमुख, सुधाकर पखाले प्रा. पि.एस खिराडे, पुरुषोत्तम मुंदडा व इतर शिक्षकांनी समर्पक उत्तरे दिली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन योगेश मुंदडा यांनी केले.
सदर सोहळ्याच्या यशस्वी आयोजना साठी योगेश मुंदडा, नितीन कुळकर्णी, शैलेश भुतडा, डॉ. किशोर काबरा, गजानन पाटील, किशोर लाहोटी, सुखदेव बळी, गोविंद वर्मा, उदय देशमुख, प्रकाश पखाले, प्रल्हाद बुंदे, अनील जाधव, दिपक घुगे, समाधान सरकटे,लक्ष्मी पुरोहित-परिख, वर्षा मुंदडा- मालपाणी, शेलगावकर, विशाल पु, दीपाली लाहोटी-भुतडा, अनिल गट्टाणी, रमेश बळी, अतुल भांडेकर, विठ्ठल काबरा, गजानन बळी, राधेश्याम घुगे, किशोर द्वारकादास काबरा यांच्यासह अनेक माजी विद्यार्थीनी यासाठी परिश्रम घेतले. हा अनोखा सोहळा केवळ आठवणींचा पूल बांधण्यासाठीच नव्हे तर जुन्या नात्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस म्हणून हे सर्व विद्यार्थी एकत्र आले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button