मुक्ताईनगरात आनंद ट्रेडर्स जीएसटी पथकाचा छापा

मुक्ताईनगर प्रतिनिधी
केंद्र सरकारने जिएसटी भरणे अनिवार्य केले असताना मुक्ताईनगर येथील एका बड्या व्यापाऱ्याने कर चुकवल्याच्या संशयावरून जळगाव येथील राज्य जिएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आहे. मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याने जिएसटी भरण्यात हात चालखी केल्याच्या संशयावरून गेल्या दोन दिवसांपूर्वी अधिका-यांनी व्यापाऱ्याच्या दोन्ही आस्थापना व घरावर छापा मारला असून गेल्या दोन दिवसांपासून तपासणी करीत आहेत, याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आलेली आहे. सदर व्यापारी शहरातील एका सामाजिक सोबत जुळून समाज सेवेत देखील अग्रेसर असतो हे विशेष त्यामुळे कर चुकवेगिरी की राजकीय वैमनस्य नेमक कारवाई मागचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
मुक्ताईनगर शहरातील प्रसिद्ध व जूने बिल्डिंग मटेरियल व्यापारी आनंद ट्रेडर्स या व्यावसायिक आस्थापनेवर जिएसटी विभागाची कारवाई सुरू असून कागदपत्रे व खरेदी विक्री व्यवहारांची संबंधित अधिकारी कसून चौकशी करीत आहे.
मागील काळात देखील राज टायर्स वर अशाच प्रकारे छापा टाकून चौकशी करण्यात आली होती. दरम्यान अशा चौकशी संबंधित व्यापारी व कंपनी यांच्यात झालेल्या खरेदी विक्रीच्या तफावती मधून होत असतात. हा तपासाचा रूटीन भाग असतो. असेही अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.



