बुलढाणामहाराष्ट्र

ठेकेदाराला देयक न देणे भोवले नगर परिषद ला

नगर परिषद ला आता ७० लाखा ऐवजी दयावे लागणार १० कोटी नगर परिषदच्या भूखंडाचा होणार २७ जानेवारी२०२४ रोजी लिलाव

मलकापूर (प्रतिनिधी) मलकापूर नगर परिषदेच्या प्रशासकीय ईमारत तसेच व्यापारी संकुलाच्या बांधकामापोटी ७० लाख रूपयांचे देयक अदा न केल्याने शेवटी न्यायालयाने नगर परिषद ला मे. खरे अँड तारकुंडे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. नागपूर यांना वार्षिक १८% टक्के दराने अशी १० कोटी रूपयांच्यावर रक्कम देण्यासाठी नगर परिषदेच्या भूखंडाचा जाहीर लिलाव येत्या २७ जानेवारी २०२४ रोजी ठेवण्याचे आदेश नागपूर उच्च न्यायालयाने दिले आहेत.

या अधिक माहिती अशी की, नगर परिषदेची प्रशासकीय ईमारत व व्यापारी संकुल बांधकामाचा ठेका मे. खरे अँड तारकुंडे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. नागपूर यांना दिले गेले होते. संपूर्ण बांधकाम झाल्या नंतर नगर परिषदला ईमारत हस्तांतरीत करण्यात आली होती. या करण्यात आलेल्या बांधकामाचे अंदाजे ७० लाखांच्या जवळपास देयक घेणे बाकी होते. त्या संदर्भात नेहमी नगर परिषद प्रशासनाकडे मागणी करून सुध्दा संबंधित कंपनीला देयक अदा करण्यात आले नाही. त्यानंतर संबंधित कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली. त्याठिकाणी लवादाची नेमणूक करण्यात आली.
लवाद यांनी नगर परिषद आणि ठेकेदार यांची बाजू ऐकून घेतली आणि नगर परिषदकडून देय असलेली रक्कम ही ठेकेदार यांना देण्याचे आदेश दिले आणि त्या रक्कमेवर वार्षिक १८ टक्के व्याजाने आकारणी केली. त्यानंतरही संबंधित ठेकेदाराला नगरपरिषद प्रशासनाने देयके अदा केली नाही. आणि लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी व रक्कम वसुल होवून मिळण्यासाठी कंपनीने नगर परिषद मलकापूर यांचे विरूध्द
दरखास्त क्र. १२०/२०१९ दाखल केले होते. दरम्यानच्या काळात नगर परिषद ला लवाद यांनी दिलेले आदेशात मलकापूर येथील जिल्हा न्यायालयात अपिलद्वारे आव्हान दिले होते. सदरचे अपिल जिल्हा न्यायालयाने
फेटाळून लावले होते. त्या दरम्यान वसुलीचे कारवाईचे प्रकरणात ठेकेदाराने दाखल केलेल्या वसुली प्रकरणात विद्यमान न्यायालयाने मलकापूर नगर परिषदच्या ताब्यातील व मालकीची बुलढाणा रोडवरील जनता कला वाणिज्य महाविद्यालया समोर असलेली शहीद संजयसिंह राजपूत स्मारकाचे क्षेत्र वगळून इतर जागा जप्तीची कार्यवाही करून त्याठिकाणी न्यायालयाचा फलक लावण्यात आला होता. परंतु आजपर्यंतही नगर परिषद ने ठेकेदाराला थकीत रक्कम दिली नाही. शेवटी मा. न्यायालयाने सदरची जागा लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १० कोटी २४ लाख ३० हजार ३९०.५० रू. या रक्कमेच्या बसुलीसाठी सदरच्या मालमत्तेची लिलावाची नोटीस देवून कारवाई सुरू केलेली असून सदरच्या मालमत्तेच्या विक्रीचा लिलाव हा २७ जानेवारी २०२५ रोजी मलकापूर येथे शहीद स्मारक जवळ ठेवण्यात आला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button