मलकापूर तालुक्यातील धरणगावच्या परिसरा मध्ये एका तृतीय पंथीचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ

मलकापूर (प्रतिनिधी) मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे ७ जानेवारी२०२४ रोजी झालेल्या धक्कादायक घटनेमुळे हादरले. मलकापूर तालुक्यांतील परिसरामध्ये एका तृतीयपंथीयाची निघृणपणे हत्या करण्यात आल्याचे आढळून आल्या मुळे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले या हत्येचा गूढ उकळण्याचे आणि मारेकऱ्याला अटक करण्याचे आव्हान मलकापूर पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
एका तृतीयपंथीयाच धरणगाव परिसरा मध्ये क्रूररित्या हत्या करण्यात आल्याच्या बातमीने संपूर्ण मलकापूर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून बुलढाणा येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धरणगाव धुपेश्वर दरम्यान
धरणगावजवळ महामार्गाच्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या एका शेतात तृतीयपंथीयाचा मृतदेह आज सकाळी मिळून आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीयाच्या डोक्यावर, मानेवर मारहाणीच्या खुणा आहेत, रक्ताचे ओघळ आहेत. अत्यंत थंड डोक्याने मात्र निर्घणरित्या ही हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. अतिरिक पोलीस अधीक्षक (खामगाव) अशोक थोरात यांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. यासंदर्भात संपर्क केला असता, मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश गिरी यांनी अधिक काही सांगण्यास नाकार दिला. वरिष्ठ अधिकारी आणि पथके घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू आहे.
दरम्यान या घटनेची माहिती सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. यामुळे घटनास्थळी एकच गर्दी उसळली. या हत्येबद्दल विविध तर्क लावले जात आहे



