जे काम बिल्डरने स्वतःहुन करून द्यायचे आहे, त्यासाठी प्रशासनातील हे दलाल सोसायटीला आणि नागरिकांना अर्ज करायला लावतात!

अर्ज केल्यानंतर, यांच्या विळख्यात सर्वसामान्य माणूस आडखून जातो आणि मग हे दलाल निर्ल्लज पणे असे हजारो, लाखो रुपये घेतात!
यशस्वी सापळा कारवाई
➡ युनिट:- ठाणे
➡ तक्रारदार:- पुरुष, वय 38 वर्षे
➡ आरोपी:- 1) विजयसिंग अजबसिंग पाटील वय-44, पद- कनिष्ठ लिपीक, अति. कार्यभार सहाय्यक सरकारी अधिकारी (प्रभारी), सहा. निबंधक सहकारी संस्था अंबरनाथ वर्ग-3
2) चेतन आत्माराम चौधरी, पद -सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अंबरनाथ, वर्ग -2
➡ तक्रार प्राप्त:- दि. 03/01/2025
➡ लाच मागणी पडताळणीः- दि.03/01/2025
➡ लाचेची मागणी रक्कमः- ₹ 70,000/-तडजोडअंती रूपये ₹ 60,000/-स्विकारण्याचे मान्य केले.
➡ लाच स्वीकृती व हस्तगत रक्कम व दिनांक:- दि.03/01/2025 रोजी 60,000/-रुपये स्वीकारले.
➡ थोडक्यात हकिकत:-
यातील तक्रारदार यांनी दि. 03/01/2025 रोजी दिलेल्या तक्रारीत तक्रारदार यांचेकडे लोकसेवक पाटील यांनी स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी इमारतीची गृहनिर्माण संस्था स्थापन करणेसाठी 70,000/-रु. लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
सदर तक्रररीच्या अनुषंगाने दि. 03/01/2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान लोकसेवक विजयसिंग पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे इमारतीची गृहनिर्माण संस्था स्थापन करणेसाठी तडजोडीअंती 60,000/-रु. लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दि.03/01/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान लोकसेवक पाटील यांनी तक्रारदार यांचेकडून मागणी केलेली लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष 60,000/-रु. तक्रारदार यांचेकडून स्वीकारली.तसेच सदर रक्कम स्वीकारण्याकरिता लोकसेवक चेतन पाटील, सहाय्यक निबंधक यांनी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. लोकसेवक पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
लोकसेवक यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.



