संजय गांधी , श्रावण बाळ योजने चे लाभार्थ्यांचे अनुदान डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार…

खामगाव प्रतिनिधी रोकडे
खामगाव, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणाली अंतर्गत लाभाची रक्कम जमा होणार असून लाभार्थ्यांनी आपला आधार नंबर बँक खात्याची लिंक करण्याचे आव्हान खामगाव तहसीलदार सुनील पाटील यांनी केले आहे. लाभार्थ्यांच्या योजनेचे अर्थसहाय्य ऑक्टोबर महिन्यापासून डीबीटी प्रणाली द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामध्ये श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी विधवा ,दिव्यांग, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थी यांनी डीबीडी द्वारे अर्थसहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या आधार कार्ड आधार केंद्रावर जाऊन अद्यावत करून घ्यावे. आधार नंबर आपल्या बँक खात्याचे आधार लिंक व केवायसी करून तसे या कार्यालयास कळवावे अन्यथा सदर योजनेचा लाभ द्वारे लाभार्थ्यांना खात्यात जमा होण्यास तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकतात याची नोंद घ्यावी. करिता सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे असे आवाहन खामगाव तहसीलदार सुनील पाटील यांनी केले आहे…..✒️



