बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

एसटी प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना; सवलतींसाठी कार्ड आता अनिवार्य….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

बुलढाणा– दि. १२ मार्च २०२६
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून आता एसटी प्रवासातील सवलती मिळवण्यासाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या योजनेमुळे प्रवाशांना डिजिटल व कॅशलेस पद्धतीने सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
या योजनेअंतर्गत महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग प्रवाशांना सवलती मिळवण्यासाठी NCMC कार्ड आवश्यक राहणार आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांना डिजिटल व्यवहाराची सुविधा देण्यासाठी ही योजना सुरू केली असून त्यामुळे तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.
प्रवाशांना हे कार्ड काढण्यासाठी अधिकृत एजन्सीमार्फत नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर सुमारे ३० दिवसांच्या आत कार्ड मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्डचे रिचार्ज करणेही अत्यंत सोपे असून ते विविध केंद्रांवर किंवा डिजिटल पद्धतीने करता येणार आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांनाही या सुविधेचा लाभ मिळावा यासाठी एसटी महामंडळाने अधिकृत एजन्सीमार्फत गावागावात संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या केंद्रावर जाऊन सहज NCMC कार्ड काढता येणार आहे.
महामंडळाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर NCMC स्मार्ट कार्ड काढावे. त्यामुळे भविष्यातील प्रवास अधिक सोयीस्कर आणि कॅशलेस होणार आहे…..✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button