भा.रा काँ चे मा. नगरसेवकांच्या प्रभागात फुलले कमळ !

मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर
विधानसभा मतदार संघााच्या निवडणुकीचा लागलेला शिक्षित अनपेक्षित निकाल आणि मतदार संघामध्ये संरू असलेल्या राजकीय घडामोडी ची चर्चा आणि उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या आकड्यांची गणिते ही धक्का दायक आहेत. मलकापूर शहरा मध्ये असलेल्या एकूण ५५ बुथ केंद्रांपैकी अधिकत्तर बुथ केंद्रावर भा.रा.काँ पुढारी, आणि कार्यकर्ते तसेच पदाधिकारी व माजी नगरसेवकांचे बालेकिल्ला असलेल्या त्यांच्या प्रभागामध्ये कमळ फुलल्याचे मतदाना च्या (ईव्हीएम मशीन) आकडेवारी वरून समोर आले.
मलकापूर शहरामध्ये एकूण ५५ बुथ केंद्रे आहेत. त्यामध्ये ३३ बुथ केंद्रांवर आ. चैनसुख संचेती यांनी आघाडी घेतलेली असलीतरी २२ बुथ केंद्रावर माजी आमदार राजेश एकडे यांना मतांची आघाडी म्हणजे काँग्रेसला मते अधिक मिळालेली आहेत. बुथ क्र. १४४ ते १५९ ही केंद्रे मुस्लीम बहुल वस्तीचीआहेत. याठिकाणी भा.रा.काँ.ला ११ हजार ४४५ असे मतदान मिळाले तर यामधीलच बुथ क्र. १४४ व १४५ सालीपुरा, फुकटपुरा, ग्रामीण पोलीस स्टेशन हा मिश्रित वस्तीचा भाग असल्याने त्याठिकाणी भा.ज.पा.ला १२७९ मते मिळाली. तर बुथ क्र. १६० ते १६४ शिवाजीनगर, पंतनगर, संभाजीनगर, सुभाषचंद्र बोस नगर,
आठवडी बाजार, रामवाडीचा काही भाग असून यामध्ये भा.ज.प.ला २२९८ तर भा.रा काँ.ला १४१२, बुथ क्र. १६५ ते १७० यामध्ये जवाहरनगर, विष्णुवाडी, सावजी फैल, लक्ष्मीनगर, पुरोहीत कॉलनी, मुकुंद नगर, चाळीसबिघा, प्रशांतनगर, रामवाडीचा उर्वरीत भाग, जाधववाडी यामध्ये भा.रा.काँ.ला १२४७ तर भा.ज.प.ला ३६०६, बुथक्र. १७१ ते १७३ आणि १९०, १९१ माता महाकाली नगर, संत ज्ञानेश्वर नगर, चाळीसबिघा या परिसरचा काही भाग यामध्ये भा.रा.काँ.ला ६७० तर भा.ज.पा.ला २६५५, बुथ क्र. १७४ ते १७५ वकीलवाडी, गुरूनानक नगर, राधाकिसन चाळ, शनीमंदीर वार्डमध्ये भा.रा.काँ.ला ३१७ तर भा.ज.पा.ला १३१९, तर बुथ क्र. १७६ ते १८१ राधाकिसन चाळ, मोहनपुरा, श्रीराम मंदिर वार्ड, टिळकवार्ड, कुलमखेल, नसवाला
चौक, सायकलपुरा, देशपांडे गल्ली, लखानी चौक, जैन मंदीर , संचेती गल्ली, गांधी चौक या भागा मध्ये भा.रा.काँ. ला २७९२ तर भा.ज.पा.ला २३०७, बुथ क्र. १८२ ते १८५ दुर्गानगर, बारादरी, नसवाला चौक, असुरगल्ली, पायविहिर, मंगलगेट, किल्ला वार्ड, देशपांडे गल्ली, बाजीप्रभू नगर या भागा मध्ये भा.रा.काँ.ला १५४६ तर भा.ज.प.ला १४८१, बुथ क्र. १८६ ते १८९ मदीना मस्जीद , काळीपुरा, माळीपुरा, आंबेडकर नगर, भिमनगर, जवाईनगर या बाबा मध्ये भा.रा.काँ.ला १७९१ तर भा.ज.पा.ला ८३५, बुथ क्र. १९२ ते १९८ या मलकापूर ग्रामीण ग्राम पंचायत या भागा मध्ये भा.रा.काँ.ला १४८१ तर भा.ज.पा.ला २९७२ असे मतदान झाले. मलकापूर शहरामधील ५५ बुथ केंद्रापैकी ३३ बुथ केंद्रावर महायुतीने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मलकापूर शहरामध्ये भा.रा.काँ. पुढारी आणि कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचे बालेकिल्ला असलेल्या त्यांच्या प्रभागामध्ये कमळ फुलल्याचे मतदानाच्या (ईव्हीएम मशीन) च्या आकडेवारीमधून समोर आले आहे. मलकापूर शहरा मध्ये महायुतीच्या घटक पक्ष भा.ज.पा.ला मागील ३० वर्षात कधीही मतांची आघाडी घेता आली नाही त्या महायुतीच्या घटक पक्ष म्हणजे भा.ज.पा.ला यावेळी मात्र सन्मानजनक मतदान झाल्याने भा.रा.काँ. च्या पुढार्यांना व कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची चर्चा मलकापूर शहरात बोलल्या जात आहे.



