शेतकऱ्यांच्या जीवनाची दिशा व जीवनमान बदलवून टाकणारा अर्थ संकल्प आहे

*शेतकऱ्यांच्या जीवनाची दिशा व जीवनमान बदलवून टाकणारा अर्थ संकल्प आहे
– आमदार ॲड.आकाश फुंडकर**राज्यातील शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्याचा मिळून 12,000 रुपयांचा नमो शेतकरी सन्मान निधी मिळणार**बुलढाणा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अर्थसंकल्प*राज्यातील भाजपा शिवसेना युतीची शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थ संकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केला. संपुर्ण राज्यातील कानाकोपऱ्यातील व्यक्तीचा, शेतकऱ्यांचा, महिलांचा, विद्यार्थ्यीनींचा संस्थांनचा, दलीत, मराठा, ओबीसी, धनगर, अल्पसंख्यांक या सर्वांचा विचार या अर्थ संकल्पात केला गेला असून हा अर्थसंकल्प जणु शेतकऱ्यांच्या जीवनस्तर सुधरवण्याचा संकल्पच आहे. या अर्थ संकल्पामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाची दिशा व जीवनस्तर बदलवणारा ठरणार आहे, सोबतच बुलढाणा जिल्हयासाठी हा अर्थ संकल्प ऐतिहासिक ठरणार आहे, अशी प्रतिक्रीया आज सादर केलेल्या अर्थ संकल्पावर भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली आहे. आजच्या अर्थसकल्पात काय नाही ? कोणत्याही राज्याचा विकास करण्यासाठी त्या राज्याच्या राज्य कर्त्यांची इच्छा शक्ती महत्वाची असते. मागील अडीच वर्षाचा बिघाडी सरकारचा कार्यकाळ जणु राज्यावर अडीच वर्षाची साडेसातीच होती. राज्याच्या जनतेने त्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात अतोनात हाल सहन केलेत. अनेक लोकांना विनाकारच्या अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु राज्यात मागील 8 महिन्यापासून भाजपा शिवसेना युतीची सरकार आल्यापासून पुन्हा राज्याच्या विकासाने जोर धरला आहे.. जणु एखादयाची साडेसाती संपावी याप्रमाणे आजच्या अर्थसंकल्पात सर्वांसाठी भरभरुन देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये, आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये इतका निधीची तरतुद करण्यात आली आहे. हे राज्य छत्रपति शिवाजी महाराजांचे आहे यासाठी त्यांच्याशी संबंधीत सर्व ऐतिहासिक वास्तु जोपासल्या जाव्या, त्यांचे विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचावे यासाठी विविध किल्ले व उद्याने जोपासल्या जाणार आहेत. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित.1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास. असा अर्थ संकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडला. 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी – नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, राज्य सरकारने जाहीर केली आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारने भर टाकत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. यांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये शेतकरी सन्माननिधी “नमो योजने”तून मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार आहे. यामुळे राज्यातील 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे. यासाठी 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणारमहाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे. आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतल्या जात होते. आता शेतकऱ्यावर पिकविम्याचा हप्ता भरण्याचा कोणताच भार नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा हप्ता भरणार आहे. शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे. यासाठी 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनांचे लाभ मिळणार आहेत. 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचे लाभ देण्यात येणारआहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले आहेत. 12.84 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा केले आहेत.महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी महाकृषिविकास अभियान, राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार, पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत, तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट,समूहांसाठी योजना, एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार, 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार, ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार, मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक स्तरावर वाढवली, आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर, या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत,गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून काढण्यात येत होता परंतु आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे व ही योजना राज्य सरकार राबविणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास पुर्ण कमी होणार आहे. अपघातग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार, 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ, 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी ची तरतुद केली आहे. नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येणार असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश ठेऊन या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार, नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /20 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकर्यांना निवारा-भोजन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.शेतकर्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन व जेवणासाठी शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपयांची तरतुद. महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार, 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार, धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये, 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी, महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार, 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार, अहमदनगर येथे मुख्यालय असणार, राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.शेतकर्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना, प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या, वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा, दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असून शेतकरी लोडशेडींग पासून मुक्त होणार आहेत. प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप देण्याचा संकल्प आहे. प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी करण्यात येणार आहे. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत नदीजोड प्रकल्प.- दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून, नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्यातील पाणी वापरणार, मुंबई, गोदावरी खोर्यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार- मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ तसेच वैनगंगा खोर्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ होणार आहे. तापी महापुनर्भरण प्रकल्प, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी महापुनर्भरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतून धाराशिव, बीड जिल्ह्यांतील 133 गावांना सिंचन लाभ होणार आहे.या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणार- गेल्या 8 महिन्यात 27 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आल्या आहेत.चालू 268 पैकी 39 प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्यात येणार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील 6 प्रकल्प यावर्षी पूर्ण करणार, बळीराजा जलसंजीवनी योजनेतील 24 प्रकल्प पूर्ण करणार, गोसिखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास यावर्षी 1500 कोटी, जून 2024 पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार, कोकणच्या सिंचन सुविधांसाठी विशेष कृती कार्यक्रम, खारभूमी बंधार्यांच्या कामांना गती, मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणी देण्यात येणार आहे, बीड, लातूर जिल्ह्यांसाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून पाणी देण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून धरणातून पाणी देण्यात येणार आहे. *राज्याचा अर्थसंकल्प बुलढाणा जिल्हयासाठी ऐतिहासिक ठरणार – भाजपा जिल्हाध्यक्ष आ.आकाश फुंडकर* – राज्याच्या भाजपा शिवसेना युतीच्या मा.ना. श्री एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री व मा.ना. श्री देवेंद्रजी फडणवीस सरकारने बुलढाणा जिल्हयावर खास मेहरनजर ठेवत, या ऐतिहासिक अ र्थ संकल्पात खामगांव जालना रेल्वे रेल्वे साठी तरतुद केली आहे. समृध्दी देऊळगांव राजा खामगांव शेगांव रस्ता चौपदरीकरणाच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. नदया जोड प्रकलपात अत्यंत महत्वाकांक्षी व बुलढाणा जिल्हयातील शेतीला वरदान ठरणाऱ्या वैनगंगा खोर्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पाव्दारे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला,बुलढाणा, वाशिम या जिल्हयाना फायदा होणार आहे. पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी महापुनर्भरण प्रकल्पाचा देखील समावेश या अर्थ संकल्पात करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्हयासह 14 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये बांधण्यात येणार आहेत. महानुभाव पंथाचे दैवत श्री चक्रधर स्वामी यांचे बुलढाणा जिल्हयातील जाळीचा देव या देवस्थानाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली आहे. या अर्थ संकल्पात यापुर्वी कधीच बुलढाणा जिल्हयासाठी एवढी तरतुद व बुलढाणा जिल्हयाचा एवढा विचार केला गेला त्यामुळे हा बुलढाणा जिल्हयासाठी ऐतिहासिक अर्थ संकल्प आहे अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी राज्य अर्थ संकल्पावर दिली आहे.



