संविधान बदलणार नाही, पण त्याचे हृदय बदलल्या जाईल!-ॲड. प्रकाश आंबेडकर

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम : संविधानाचा रंग कोणता यावरून काँग्रेस,भाजप भांडत आहेत. लोकसभेच्या लायब्ररीत संविधानाची डुप्लिकेट प्रत आहे. संविधानावर भांडण्यापेक्षा त्यांनी लोकसभेत जाऊन संविधान बघावे. दोन्ही पक्ष लोकांना मूर्ख बनवित आहेत. संविधान शंभर वर्षे बदलले जाणार नाही. संविधान कुणीही बदलू शकणार नाही; परंतु संविधानाचे हृदय बदलले जाईल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
जोशाबा महासंकल्प सभेच्या निमित्ताने वंचित उमेदवारांच्या प्रचारार्थ वाशिम येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी किरण गिन्हे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, रवींद्र मोरे, दत्तराव गोटे आदीची उपस्थिती होती. पुढे बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, मूळ प्रश्न संविधान, राज्यघटना वाचविण्याचा होता. राहुल गांधी, नरेंद्र मोदी, अमित शाह संविधान डोक्याला लावतात. कोर्टाने मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण मान्य केले. त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे ,परंतु काँग्रेस, भाजप तसे करणार नाही. त्याची अंमलबजावणी फक्त वंचित करेल, असे आंबेडकर म्हणाले. संचालन ज्योती इंगळे यांनी केले.
वाशिम येथील सभेला उपस्थित ॲड. प्रकाश आंबेडकर
धार्मिक उन्माद वंचित थांबवेल
विधान परिषदेत कपिल पाटील यांच्या माध्यमातून मोहम्मद पैगंबर बिल मांडले. देवी, देवतांवर टीका टिप्पणी केली जात आहे. यामुळे दंगली घडतात. लोकांची घरे उद्ध्वस्त केली जातात. काँग्रेस, ठाकरे त्या बिलाचा विचार करणार नाही. ते बिल मंजूर करणार नाहीत. जर तो कायदा असता तर मोहम्मद पैगंबरांवर जर कुणी बोलला असता तर त्याच्यावर कारवाई झाली असती. त्यामुळे हा उन्माद थांबविण्याचे काम वंचित करेल, असे आंबेडकर म्हणाले.
जरांगे बरोबर कोण?
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे बरोबर कोण आहे? जरांगेची मागणी आहे की, ‘ओबीसी तून मराठ्यांना आरक्षण द्या. कोर्टाने दोन वेळा तसा प्रस्ताव फेटाळला. सगळे पक्ष ओबीसी विरोधात आहेत. ओबीसी जनगणना नाही तोपर्यंत शिक्षण व नोकरीतील आरक्षण स्थगित केले, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
*एससी, एसटी आरक्षणाचे वाटोळे*
सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला क्रिमिलेयरचा. क्रिमिलेयर म्हणजे एका कुटुंबातील एका व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतल्यास ते कुटुंब क्रिमिलेयर होते. ते कुटुंब क्रिमिलेयर झाले की, तो आरक्षणाच्या यादीच्या बाहेर पडतो. त्यामुळे यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे वंचित. म्हणून वंचितच्या उमेदवारास विजयी करा, असे आवाहन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
या सभेत वंचित बहुजन आघाडीचे वाशीम चे उमेदवार मेघा डोगरे, रिसोड चे प्रशांत गोळे, कारंजा चे सुनिल धाबेकर वाशीम जिल्ह्यातील वंचित चे आजी माझी पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.



